शिवाजी पार्क बनले 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क

शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश



मुंबई, दि. ११ (प्रतिनिधी) – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गजांच्या सभांनी गाजलेले, महत्त्वाच्या राजकीय कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध असणारे आणि 'मास्टरब्लास्टर' सचिन तेंडुलकरसारखे महान खेळाडू घडवणारे दादरचे ऐतिहासिक शिवाजी पार्क आता 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क' म्हणून ओळखले जाणार आहे. शिवसेनेने पालिकेच्या महासभेत मांडलेला नामविस्ताराचा प्रस्ताव आज मंजूर करण्यात आला.


दिग्गज नेत्यांच्या सभा आणि अनेक महान खेळाडू घडवणारे दादरचे शिवाजी पार्क मैदान म्हणजे मुंबईची एक अनोखी ओळख आहे. 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठीही या ठिकाणी लाखो भीम अनुयायी येतात. राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्यांसाठी शिवाजी पार्क नेहमीच आकर्षण राहिलेल्या या मैदानाला गेल्या अनेक वर्षांपासन 'शिवाजी पार्क' म्हणनच ओळखले जाते या पाश्र्वभमीवर शिवरायांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मैदानाला यावा अशी.