____ मुंबई, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे मुहूर्त काढणाऱ्या भाजपला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'पॉवर'फुल उत्तर दिले आणि सरकार पडण्याचा विषय संपवला. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे कमलनाथ सरकार अडचणीत आलेले असतानाच महाराष्ट्रातही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाजपचे 'ऑपरेशन लोटस' सुरू होईल,अशी कंडी भाजपच्याच गोटातून पसरवली जात आहे. यावर पवार म्हणाले, 'आता शिमगा संपला आहे. त्यांचे सगळे मुहूर्त संपले आहेतआता आणखी मुहूर्त काढण्याची गरज नाही.' ।
शरद पवार म्हणतातशिमगा संपला ना!
• Devendra Khanna