गर्दी टाळा, मास्क लावून फिरण्याची गरज नाही


कोरोनामुळे घाबरून जाण्याचे कारण नसून मोठे सभा-समारंभ टाळा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, मास्क लावून फिरण्याची गरज नाहीअसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. कोरोना'च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज विधिमंडळात दिवसभर आढावा बैठका घेतल्या. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा झाली. संध्याकाळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पत्रकार परिषद घेतली आणि माहिती दिलीविधिमंडळात प्रवेश नाही /